The Chief Minister Employment Generation Programme (CMEGP)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

ही योजना महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.

🔸 योजनेचे मुख्य उद्देश:

  • राज्यात रोजगाराच्या संधी वाढवणे.
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे.
  • उद्योजकांना आर्थिक सहाय्य देणे.
  • राज्यातील युवक-युवतींना स्व-रोजगारासाठी सक्षम करणे.

🔸 योजनेतील वैशिष्ट्ये: अनुदान: CMEGP योजनेत, लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या खर्चावर आधारित अनुदान दिलं जातं. विशेष श्रेणी (एससी/एसटी/महिला/दिव्यांग/माजी सैनिक) साठी जास्त अनुदान उपलब्ध आहे. (३५ टक्के पर्यंत सबसिडी. उदाहरण – जर १० लाखाचे कर्ज घेतले तर ३ लाख ५० हजाराची ची सबसिडी मिळेल.)

🔸 कर्ज: एकूण प्रकल्प खर्चापैकी काही भाग लाभार्थी स्वतः देतो, तर उर्वरित रक्कम बँकांकडून कर्ज म्हणून दिली जाते.

🔸 पात्रता: वैयक्तिक उद्योजक (स्वतः एक व्यक्ती), बचत गट आणि काही विशिष्ट कंपन्या या योजनेत अर्ज करू शकतात.

🔸 आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • लोकसंख्या दाखला
  • टी. सी. किंवा मार्कशिट
  • पासपोर्ट फोटो – ४
  • जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • प्रोजेक्ट रिपोर्ट

🔸 प्रकल्प प्रकार: उत्पादन उद्योग, कृषी-आधारित उद्योग आणि सेवा उद्योग यांसाठी ही योजना उपलब्ध आहे.

🔸 योजनेचा फायदा: या योजनेमुळे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मदत होते.

🔸 रोजगार मेळावा चे आयोजन:
जिल्हा उद्योग केंद्र व योजने राबवणाऱ्या अधिकृत बँका यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही रोजगार मेळावा आयोजित करणार आहोत या योजनेची संपूर्ण माहिती मोफत दिली जाते व संपूर्ण मार्गदर्शन संबंधित अधिकारी देतात.

🔸 नाव नोंदणी: रोजगार मेळावा करिता बुलडाणा जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातील व गावातील व्यक्ती सहभाग घेऊ शकतो. नेहमी प्रमाणे मोजकेच सीट उपलब्ध असून या करिता आजच आपले नाव नोंदवून आपला सहभाग निश्चित करावा.

🔸 नाव नोंदणी करिता संपर्क: 9359525611 / 7517686956

🔸 Brochure PDF 🔸

लाभार्थीची पात्रता :

१. १८ वर्ष पूर्ण अधिकत्तम मर्यादा ४५ वर्षे वैयक्तिक व्यक्ती लाभार्थी राहिल.
२. वैयक्तिक मालकी, भागीदारी, वित्तीय संस्थानी मान्यता दिलेले बचत गट.
३. रु.१० लाखावरील प्रकल्पासाठी ७ वी पास व रु.२५ लाखावरील प्रकल्पासाठी १० वी पास.
४. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती पत्नी अशी असेल.
५. अर्जदार यांने केंद्र अथवा राज्य शासनाच्या योजनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

सीएमईजीपी अंतर्गत लाभार्थीचे गटउद्योजकाचा स्वत:चा सहभागबॅक कर्जमार्जिन मनीचे दर (प्रकल्प खर्चाचा)
शहरी  ग्रामीणशहरीग्रामीण 
१) सर्वसाधारण१० टक्के७५ टक्के६५ टक्के१५ टक्के२५ टक्के
२) विशेष (अनु.जाती/अनु.जमाती इतर मागासवर्गीय/महिला/माजीसैनिक/ शारिरीकदृष्टया अपंग/ एनईआर/डोंगरी आणि सीमा भागातील धरुन५ टक्के७0 टक्के६0 टक्के२५ टक्के३५ टक्के

Loading

error: Content is protected !!
Scroll to Top