७ वी पास उमेदवारांना ४० हजार पगार!-जिल्हा न्यायालयामध्ये “सफाईगार” पदांची भरती सुरु!

जिल्हा न्यायालयामध्ये “सफाईगार” पदांची भरती बद्दल संक्षिप्त माहिती 

  • पदाचे नाव – सफाईगार
  • पदसंख्या – 05 जागा (४ खुला + १ प्रतीक्षा यादी)
  • शैक्षणिक पात्रता – ७ वी पास .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन स्पीड पोस्ट द्वारे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), बस स्टेंड समोर, चंद्रपूर ४४२ ४०१.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२५
  • अर्ज शुल्क – ३०० /-

या भरती साठी पात्रता काय आहे ?

  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • शैक्षणिक अर्हता-
    • उमेदवार किमान ७ वी (सातवी) इयत्ता उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरून त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडु शकेल.
    • उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • अनुभव :-उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकिय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास प्राधान्य दिल्या जाईल.
  • अन्य माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात वाचावी, हि PDF मराठी मध्ये दिलेली आहे.

या भरती साठी निवड प्रक्रिया काय आहे ?

आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्प सूची (short list) प्रमाणे पात्र उमेदवारांना येथे दिलेल्या पुढील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. या अंतर्गत ३० गुणांची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी घेण्यात येणार असून पस होण्यासाठी उमेदवारांना कमीतकमी १५  गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच दुसरी स्टेप म्हणजे वैयक्तिक मुलाखत ज्याला २० गुण असणार आहे, या पैकी उमेदवाराला कमीतकमी १० गुण मिळणे आवश्यक आहे. पूर्ण डिटेल माहिती PDF मध्ये नमूद आहे, तरी काळजीपूर्वक वाचावी.

तसेच, उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्याच्या दिवशी धारण करीत असलेली अचूक शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने पात्रता खाली दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी.
१) ७ वी
२) एस. एस. सी (S.S.C)
३) एच. एस. एस. सी. (H.S.S.C) किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी.
४) अर्ज दाखल करतेवेळी उमेदवार धारण करीत असलेली उच्च शैक्षणीक पात्रता नमूद करणे बंधनकारक राहील.
५) शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पूर्वानुभव असल्यास त्या संबंधीचा दाखला.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात

Loading

error: Content is protected !!
Scroll to Top