आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR-1 ते ITR-7 या सर्व प्रकारचे इनकम टॅक्स रिटर्न फॉर्म्स अधिकृतपणे प्रकाशित केले आहेत. यासोबतच ITR-V फॉर्म देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, विभागाने ITR-U नावाचा एक नवीन फॉर्म सुद्धा 19 मे रोजी जारी केला आहे. या नव्या फॉर्मच्या माध्यमातून करदात्यांना मागील 48 महिन्यांपर्यंतचे रिटर्न भरता येणार आहेत. तसेच, याच फॉर्मचा वापर करून आधी सादर केलेल्या रिटर्नमध्ये सुधारणा करणेही शक्य होणार आहे. ही सुविधा नव्या आर्थिक कायद्यानुसार लागू करण्यात आली आहे.
दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे — ज्यांनी अद्याप आपला ITR भरलेला नाही, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. CBDT (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) ने ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 ऐवजी वाढवून 15 सप्टेंबर 2025 केली आहे.
त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 आणि असेसमेंट इयर 2025-26 साठी रिटर्न सादर करणाऱ्या करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकांना आपण ITR फाईल करावा कि नाही हा प्रश्न पडलेला असतो. आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याचे फायदे अनेक आहेत.
आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस पुरावा सादर केलेला असतो. तस बघितला तर ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना आयटीआर दाखल करणे बंधनकारक नाही. तथापि, त्यांनी आयटीआर दाखल केल्यास काही फायदे त्यांना मिळू शकतात.
✅ ITR फाईल करण्याचे फायदे
- 📄 उत्पन्नाचा अधिकृत पुरावा (Income Proof)
- कर्ज, व्हिसा किंवा शासकीय कामांसाठी उपयुक्त
- 💰 टॅक्स रिफंड मिळवण्याची संधी
- TDS वजा झाल्यास परतावा मिळवता येतो
- 📉 तोटा पुढील वर्षांसाठी पुढे नेता येतो (Loss Carry Forward)
- शेअर बाजार किंवा व्यवसायातील तोट्याचा फायदा भविष्यात
- 🧾 मोठ्या व्यवहारांकरिता आवश्यक (Mandatory for High-Value Transactions)
- ₹1 कोटीपेक्षा जास्त बँक ठेवी, ₹2 लाखांपेक्षा जास्त परदेश प्रवास
- ✈️ व्हिसा प्रक्रियेसाठी उपयुक्त
- USA, Canada, UK यांसारख्या देशांना ITR लागतो
- 🧑💻 स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आवश्यक
- उत्पन्नाचा पुरावा, कर्जासाठी मदत
- ⚠️ दंड व कायदेशीर कारवाईपासून बचाव
- वेळेवर न भरल्यास ₹1,000–₹5,000 दंड
- 💳 क्रेडिट स्कोअर व कर्ज पात्रतेसाठी फायदेशीर
- बँका व वित्तसंस्था ITR पाहून कर्ज मंजूर करतात
- 📊 कर सवलती व कपात घेता येतात
- 80C, 80D, HRA, NPS यांसारख्या सवलती फक्त ITR द्वारे मिळतात
ITR भरण्यासाठी सरकारी अधिकृत असलेल्या आमच्या CSC केंद्राला भेट द्या आणि अतिरिक्त फी पासून सुटका करून घ्या!