सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही. ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने स्पष्ट केले आहे.#FactCheck #DGIPRFactCheck pic.twitter.com/lRB12AqnGq
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2026
कार्ड सध्या अनिवार्य नाही
राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
![]()
